लातूर : प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकार कामगारांच्या प्रश्ना बाबत उदासीन आहे. सरकारने कामगार कायद्यात सुधारणा या गोंडस नावाखाली मालक धार्जीने कायदे करण्यास सुरूवात केली आहे. माथाडी कायदा असंघटीत कामगारांसाठी पथदर्शी कायदा आहे. या कायद्यातही सरकार विनाकारण बदल करत आहे. तो आम्ही हाणून पाडण्याचे काम करू, गरज पडल्यास यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी दिला.
महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काँगेसच्यावतीने कामगार जोडो अभियानात असंघटीत कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्याच्या संदर्भाने दि. ४ डिसेंबर पासून राज्यभर दौरा सुरू आहे. या प्रसंगी कॉग्रेस भवन, लातूर येथे असंघटीत कामागारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल शिंदे लातूर येथे आले असता ते बोलत होते. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजकुमार होळीकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अॅड. किरण जाधव, प्रदेश सरचिटणीस राहूल वंजारी, शमीम कोतवाल, गौस गोलंदाज, किशोर कांबळे, यासीन शेख, अॅड. देविदास बेरूळे पाटील, अॅड. अंगदराव गायकवाड आदी उपस्थित होते
. राज्यात संघटीत कामगारांच्या तुलनेत असंघटीत कामगारांचे प्रमाण ९५ टक्के आहे. हे जेंव्हा माजी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या आल्यानंतर या असंघटीत कामगारांना संघटीत करण्यासाठी काँग्रेसच्या अंतर्गत एक विभाग सुरू करून त्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्याकडे दिली आहे. शिंदे हे प्रत्येक जिल्हयात जावून असंघटीत कामगारांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्या अंमलबजावणीसाठी व त्यांना काँगे्रसच्या सोबत जोडण्यात येत आहे. आज पर्यत १५ जिल्हयांचा दौरा झाला असल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजना राबविताना त्यात भ्रष्टाचार, गोंधळ चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.
घर कामगार मंडळ जवळपास बंद पडले आहे. सुरक्षा रक्षक मंडळात काम करायला अधिकारी नाहीत. माथाडी कामगार विभागात ४० टक्के कर्मचारी वर्ग कमी आहे. त्यामुळे कामगारांच्या योजना प्रत्यक्षात राबताना दिसून येत नाहीत. या योजनाच्या लाभापासून कामगार दूर राहत असल्याची टिका शिंदे यांनी केली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मार्गदर्शन व सुचना केल्या. या कार्यक्रमास असंघटीत कामगारांची उपस्थिती होती.