31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रसरपंच देशमुखांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर

रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी संतोष देशमुख प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला. आता हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

गॅसचा पाईप, पाईपाचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईपचा यात समावेश होता. या हत्यारांच्या सहाय्याने संतोष देशमुख यांना आरोपींनी अमानुष मारहाण केली.

दरम्यान, हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. चारही हत्यारे कराड गँगने तयार केली आहेत असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. या हत्यारांच्या मदतीने संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या शरीरावर १५० जखमा आढळल्या होत्या. इतकी अमानुष मारहाण त्यांना झाली होती. आरोपींनी याआधीही याच हत्यारांनी अन्य व्यक्तींना देखील मारहाण केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR