27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसर्व्हर बंदमुळे पीक नुकसानीची नोंद होईना

सर्व्हर बंदमुळे पीक नुकसानीची नोंद होईना

देवणी : बाळू तिपराळे
रब्बी पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून भरपाई मिळावी, यासाठी पिक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे मात्र गेल्या आठवडाभरापासून पीक विम्याचे सर्व्हर बंद असल्याने, पिक विमा भरावा तरी कसा असा प्रश्न शेतक-यांंना पडला आहे. सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी, महा ई केंद्र चालकत्रस्त झाले आहेत. यासंदर्भातील तक्रारीसाठी असलेले कंपन्यांचे हेल्पलाईन नंबरही बंद असल्याने तक्रार तरी कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे.

खरीप हंगाम हातचा वाया गेल्यानंतर भरून निघेल, या आशेने शेतक-यांनी अपु-या ओलीवर रब्बीची पेरणी केली आहे मात्र जमिनीत ओलावा नसल्याने कोवळी पिके सुकू लागली आहेत. त्यात देवणी परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने या पिकांना तूर्तास तरी जीवदान मिळाले आहे. या पिकांचा पिक विमा उतरविण्यासाठी शेतक-यानी महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी होत आहे मात्र गेल्या आठ दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्याने, पिक विमा भरता येत नाही. तर कधी आधार तर कधी सातबारा संकेतस्थळ बंद असल्याने शेतक-यांचे अर्ज त्रुटीमध्ये जात आहेत. याबाबत कंपनीकिंवा सीएससी कडून कुठलीही माहिती मिळत नसल्याने शेतकरी केंद्र चालक त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे रब्बी पिक विमा उतरवला उतरवला जात नसल्याने, एक रुपयात पिक विमा हे केवळ घोषणाच ठरते की काय ? असा प्रश्न केला जात आहे. आठ दिवसापासून सुरू असलेला सर्व्हरचा अडथळा केव्हा दूर होणार असा सवाल शेतक-यातून उपस्थित केला जात आहे. शेतक-यांना सुरळीत पिक विमा भरता यावा यासाठी ऑनलाईनची सुविधा असली तरी सर्व्हर डाऊनमुळे दिवसभर महा-ई-सेवा केंद्रावर शेतक-यांंना थांबून राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR