19.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeमहाराष्ट्रसहकारासाठी काय केले याचा हिशेब द्या

सहकारासाठी काय केले याचा हिशेब द्या

अमित शाह यांची पवार यांच्यावर टीका
नाशिक : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य केले असून, तुम्ही १० वर्षे देशाचे कृषिमंत्री होता. त्यावेळी सहकार क्षेत्र कृषी मंत्रालयांतर्गत होते. त्यावेळी सहकार क्षेत्रासाठी काय केले, साखर कारखान्यांसाठी काय केले आणि शेतक-यांसाठी काय केले, याचा हिशोब महाराष्ट्राला द्यायला हवा. नेता होण्यासाठी फक्त मार्केटिंग पुरेसे नाही तर त्यासाठी तळागाळात काम करावे लागते, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी त्यांनी संस्थेच्या काजू प्रक्रिया युनिट आणि माती तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील सहकार क्षेत्रातील लोक, सहकार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करायचे, त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची स्थापना केली. यामुळे देशातील शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. इथे आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर कुठली व्याख्या असेल तर ती सहकार आहे, असेही अमित शाह म्हणाले. मी इथे आज राजकारण करण्यासाठी आलो नाही. पण सहकार मंत्रालयाची स्थापना आणि साखर कारखान्यांच्या कराच्या प्रश्नांसारख्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोडवल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR