32.6 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रसहा महिन्यात आणखी एक विकेट पडेल

सहा महिन्यात आणखी एक विकेट पडेल

सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

पुणे : प्रतिनिधी
१०० दिवसांमध्ये महायुतीमधील एका मंत्र्याची विकेट गेली. सहा महिने आणखी थांबा, आणखी एक विकेट पडेल. राज्यातील एक मंत्री खूप बोलत आहेत. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या या विधानांमुळे त्या नेमके कोणत्या मंत्र्यांचा उल्लेख करत आहेत, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या आढावा बैठकीत केली गेली. धनंजय मुंडे हे अजित पवार गटात सामील झाल्यानंतर, त्यांच्यावर शरद पवार गटाकडून वारंवार निशाणा साधला जात आहे.

सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील पक्षाच्या बैठकीत केलेल्या विधानांमुळे महायुती सरकारमधील मंर्त्यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी संबंधित मंत्र्याचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच. सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांनी, ‘बरं झालं पक्ष तुटला, जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही,’असे तीव्र शब्दांत टीका केली.

तसेच, राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर टीका कर, शंभर दिवसांत एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार आहे,’’ असा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील कोणत्या मंर्त्यावर ते बोट ठेवत आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबांना भेट देण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या परिस्थितीची जाणीव होईल.असेही त्या म्हणाल्या.

महिला अत्याचारांवरून टीका
सुळे यांनी राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून महायुती सरकारवर टीका केली. त्यांनी बोपदेव घाटातील मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करून सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, गृहमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला जायला वेळ आहे, पण पीडितेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कारवाई करायला वेळ नाही, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR