31.4 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगली : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी सोमवार (७ एप्रिल) गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उष:काल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून विश्रामबाग पोलिस तपास करत आहेत.

सुरेश पाटील यांचे गेल्या ३ दशकांहून सांगलीच्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे नाव आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. २००८ मध्ये जयंत पाटील यांनी महाआघाडीची मोट बांधत सांगली महानगरपालिकेत काँग्रेसचा पराभव करत सत्तांतर घडविले होते. त्यात सुरेश पाटील आघाडीवर होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडूनच विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

गतवर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण तेव्हापासून ते काही कारणांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अलिप्त होते. रात्री उशिरा रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR