20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही

सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही

कॉंग्रेसने आता कामाला लागावे
मुंबई : प्रतिनिधी
सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याने स्थानिक नेत्यांकडून मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे मैत्रीपूर्ण लढत फेटाळून लावली. सांगलीमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आता वेळ न दवडता ठरल्याप्रमाणे काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. मुळात मैत्रीपूर्ण लढतीला काहीही अर्थ नसतो. जेव्हा मैत्री असते तेव्हा तेथे लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते असे सांगतानाच तसे झाले तर महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा घात होईल, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर व माझ्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता. त्या ऋणानुबंधाला जागून आम्ही हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. पण आज त्यांचे आणि आमचे जमले नसले तरी भविष्यात जमणारच नाही, अशी भूमिका त्यांनी घेऊ नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले. त्यांचे आणि माझे आजोबा त्यावेळी समाज सुधारणेसाठी झटले होते. आमची प्रामाणिक इच्छा होती की, आम्ही दोघेजण हुकूमशाही विरोधात आणि विशेषकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटना धोक्यात आली असताना आपण एकत्र येऊन हुकूमशाहीला दाखवून द्यायला हवे होते. पण ते काहीही बोलले तरी आम्ही त्यांच्याविरोधात बोलणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR