19.3 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रसांगली विभागात १०० बस भंगारात

सांगली विभागात १०० बस भंगारात

सांगली : प्रतिनिधी
ग्रामीण भागासाठी लाईफलाईन ठरलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे अनेक बस या भंगार झाल्या आहेत. यात सांगलीच्या राज्य परिवहन मंडळाला सध्या भंगार बसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी ७५ बस भंगारात काढाव्या लागल्या होत्या. आता येत्या तीन महिन्यांत आणखीन तीस बस भंगारात जाणार असून वर्षभरात जवळपास १०५ बसेस भंगारात जात आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यात बसची संख्या कमी पडत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा सांगली विभाग फायद्यात आला आहे. सुरक्षित आणि विना अपघात सेवा देत असल्यामुळे अनेक सवलतींमुळे बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या ही वेगाने वाढत आहे. उत्कृष्ट सेवा बजावून विना अपघात सेवा देणा-या बसला मात्र भंगार बसचे ग्रहण लागले आहे. तर गेल्या पाच ते सहा वर्षांत सांगली आगाराला एकही नवीन बस मिळाली नाही. अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे भंगार बसमधूनच प्रवाशांना जावे लागत आहे.

बसअभावी फे-यांमध्ये करावी लागते कपात
पंधरा वर्षांचा कालावधी गेल्यानंतर संबंधित बस ही भंगारात काढावी लागते. यामुळे गेल्या वर्षभरात ७५ बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. अगोदरच बसेसची संख्या कमी आणि भंगार बसचे प्रमाण वाढल्यामुळे आता सांगलीच्या एसटी महामंडळाकडे ६९० बसच उरल्या आहेत. परिणामी बसअभावी बसफे-यांमध्ये कपात करावी लागत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि नादुरुस्त बसचे प्रमाण पाहता सांगली जिल्ह्यासाठी नवीन बसेसची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR