28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeलातूर‘सांगळा’ स्वाभिमानी वृद्ध शेतक-याच्या कष्टाची गोष्ट 

‘सांगळा’ स्वाभिमानी वृद्ध शेतक-याच्या कष्टाची गोष्ट 

लातूर : एजाज शेख
‘सांगळा’ मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात अडचणींना न जुमानता एका स्वाभीमानी वृद्ध  शेतक-याच्या कष्टाची गोष्ट आहे. ‘सांगळा’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक रावबा गजमल हे  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील किनगाव येथील आहेत. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण गेवराई येथेच झाले तर नाट्यशास्त्राचा अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पुर्ण केला. ते मराठवाड्याचे असल्यामुळे त्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची जवळून जाणिव आहे. ‘सांगळा’ म्हणजे विहिरीच्या तळातील पाणी. लॉकडाऊनमध्ये नाटकाचे प्रयोग बंद होते. या काळात रावबा गजमल यांनी ही कथा लिहिली. चित्रपटाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रश्न, समस्या सर्वदुर जाण्यात या उद्देशानेच ‘सांगळा’ची कथा लिहिली, असे रावबा म्हणाले.
नाटकातून चित्रपटाकडे वळणे तसे माझ्यासाठी कठीणच होते. चित्रपट कार्यशाळा केल्या असल्यातरी तांत्रिक माहिती कमी. त्यामुळे चित्रपट माध्यम समजून घेण्यासाठी ‘दुपारची शाळा’ही शॉर्टफिल्म केली. मुंबईत जाणकारांना शॉर्टफिल्म दाखवली. यातील ‘सिनेमॅटिक लॅग्वेज’ योग्य असल्याचा अभिप्राय मिळाल्यानंतर ‘सांगळा’चे चित्रीकरण सुरु केले. पैठण तालुक्यातील जामवाडी तांडा, थापटी तांडा, रजापूर परिसरात चित्रीकरण केले. तळ गाठलेली विहीर सापडल्यानंतरच चित्रीकरण केले.   चित्रीकरणातील तांत्रिक माहिती नसल्यामुळे त्याचा फारसा विचार न करता अनिल बडे या मित्राचा कॅमेरार घेऊन चित्रीकरण सुरु केले. अँगलची चिंता डोक्यातून काढू आणि जे सांगायचे ते चित्रीत करु, असे त्याने सांगीतले. आम्ही त्याच पद्धतीने चित्रीरकण केले. एकाच लोकेशनवर चित्रपट घडतो. साध्या कॅमे-यावर चित्रीकरण केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. ‘पिफ’मध्येही सर्वांनी तांत्रिक वाजुंचे कौतूक केले. मुंबईत भरत जाधव या मित्राने संकलन पुर्ण केले. जसे पैसे उपलब्ध होतील तसे काम केल्याने चित्रपट पुर्ण होण्यास दोन वर्षे लागले.
शेतक-यांचे चित्रीकरण फक्त आत्महत्यांशी निगडीत नसावे. जगातील कोणत्याही भाषेतील चित्रपट त्यांच्या देशातील कामगारांच्या मर्यादा सांगतानाच बलस्थानेही सांगतो. आशावादी असणे दाखवतो. आपले शेतकरीही कणखर असून प्रतिकुल परिस्थितीतही लहानशा आशेवर जगतात. गाय, तिच्या वासरासाठी शेतकरी धडपडतात. दुष्काळग्रस्त शेतक-यांपर्यंत सरकारच्या योजना पोहचतात का आणि अशा समकालीन प्रश्नांचा वेध घेत शेतक-यांचा खंबीरपणा दाखविण्याची गोष्ट म्हणले ‘सांगळा’ होय.
या चित्रपटात मराठवाड्यातील एका स्वाभिमाननी शेतक-याची कथा मांडण्याचा प्रयत्न रावबा गजमल यांनी  केला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अनिल दाभाडे, दिलीप वाघ, ज्योती गंगावणे, बाळू बटोळे, नारायण पवार, नितीन मुंडे, कृष्णा गांगवे आणि रावबा गजमल यांच्या भूमिका आहे. तसेच छाया दिग्दर्शक अनिल बडे, संकलन भरत जाधव, पार्श्वसंगीत असित सपकाळ, साऊंड डिझाईन प्रशांत कांबळे, कला दिग्दर्शन आणि प्रोडक्शन हेड रामेश्वर देवरे, वेशभूषा- शुभम पाईकराव, मॅनेजमेंट-विठ्ठल बोबडे, कॅमेरा सहाय्यक- मारुती मुंडे, सहाय्यक दिग्दर्शक-दशरथ सोळुंके, शुभम पाईकराव आणि नितीन मुंडे, पोस्ट   मॅनेजमेंट- कृष्णा गांजवे, गणेश गांजवे (राजापूर), अभिनेत्री कोमल सोमारे -गजमल, प्रा. अस्लम शेख, रुपेश परतवाघ, पांडुरंग शिनगारे, यांनी केले आहे. संदीप पाटील, भूषण खोडके,लक्ष्मण काळे, पवन गवळी, शुभम कोल्हे,गौरी जोशी, वरद वाघमारे यांचेही सहकार्य लाभले. ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त ‘सांळगा’ हा चित्रपट महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीव्हीआरमध्ये सुरु असलेल्या तिस-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आज सायंकाळी ६ वाजता सिनेरसिकांना पहावयास मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR