साखरेचा गोडवा महागला वाढत्या दराने; सर्वसामान्यांचा बजट कोसळला

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून जीवनापयोगी आणि त्यातही खाद्य पदार्थांशी संबंधित वस्तूंमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. डाळी, भाज्या, फळे या वस्तूंमध्ये होणा-या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोसळले आहे. त्यातच आता साखरेच्या दरातही मोठी वाढ झाल्याने चहातील गोडवा सुद्धा महागला आहे. साखरेच्या वाढत्या दरामुळे आता मिठाईच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात साखरेसोबतच मिठाईचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता सणासुदीच्या काळात गोड पदार्थ बनवण्यासाठी लागणारी साखरही महाग होत असल्याने याबाबत सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

साखरेच्या दराने मोठी उच्चांकी गाठली असून, साखरेचे प्रति क्विंटल दर हे ७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. . साखरेची ही आत्तापर्यंतची इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे साखरेचा भाव वाढल्याने सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा आणि साखरेचा दर पुन्हा एकदा सामान्यपातळीवर येण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तर, मुंबईतही ७० ते ७५ रुपयांदरम्यान साखर विक्री होत आहे.
साखरेच्या दरात झालेली ही मोठी वाढ आता थेट मिठाई व्यवसायाच्या गणितावर परिणाम करू लागली आहे. कारण मिठाई तयार करण्यासाठी साखर हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे साखर महागली आणि मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. याचा परिणाम मिठाईच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.

साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. देशातील साखर उत्पादनासाठी ऊस हा मुख्य कच्चा माल आहे. काही भागांत हवामानातील बदल, पाऊस किंवा पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होतो. याशिवाय साखरेची मागणी वाढली आणि बाजारातील पुरवठा तुलनेने कमी झाला तर दर वाढण्याची शक्यता असते. ऊस उत्पादक शेतक-यांना द्यावी लागणारी ऊसाची किंमत, कारखान्यांचा उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि इतर खर्च वाढल्यास त्याचाही परिणाम साखरेच्या अंतिम किमतीवर होतो. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीनुसार घाऊक तसेच किरकोळ बाजारातील दर बदलत असतात.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41
Video thumbnail
DEVANI|संघर्ष,जिद्द आणि लोकविश्वासाचा चेहरा;रामलिंग शेरे
03:25
Video thumbnail
DEVANI|16 वर्षांची आरोग्यसेवा,करुणा कर्तव्याचा आदर्श प्रवास- डॉ संतोष बिरादार
02:29
Video thumbnail
DEVANI|स्वप्नातील घरांना वास्तवाचे रूप देणारा तरुण; बांधकाम व्यावसायिक वैभव बिराजदार
01:58
Video thumbnail
AUSA|तर्कसे बंधूनी माळरानावर फुलवली ड्रॅगन शेती
02:27
Video thumbnail
DEVANI|श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा प्रेरणादायी प्रवास
02:33
Video thumbnail
DEVANI|देवांनी तालुक्यातील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत नागतीर्थवाडी
02:37
Video thumbnail
JALKOT|बांधकाम विभागासाठी सॉफ्टवेअर भगवंत गुणालेचे स्टार्टअप
03:05
Video thumbnail
JALKOT|कृषी सखी ते यशस्वी उद्योजिका सुचिता मरेवाड
03:55
Video thumbnail
AHAMADPUR|ख्यातनाम हिंदी साहित्यिक अनिता शिंदे पाटील
11:05
Video thumbnail
AUSA|शिक्षणापासून वंचितांच्या प्रगतीसाठी माझं घर प्रकल्प राबिवणारे- शरद झरे
01:36
Video thumbnail
AHAMADPUR|गुणवतेची परंपरा जपणाऱ्या मुख्याध्यापिका दर्शना हेंगणे
13:42
Video thumbnail
JALKOT|डोंगरी भागातून राष्ट्रीय स्तरावर सीमा शेख ची झेप
01:38
Video thumbnail
JALKOT|सेवाभावाची प्रेरणादायी वाटचाल;डॉ वरूण अंदुरे
03:25

Latest news