लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. ९ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कलारंग लातूरच्या वतीने सुरेश शांताराम पवार लिखीत व कल्याण वाघमारे दिग्दर्शित ‘साखरेचे पाच दाणे’ हे दोन अंकी नाटक सादर झाले. नाटकाच्या संहितेनूसार दिग्दर्शकाने कल्पकतेने केलेली मांडणी नाट्यरसिकांना भावली. त्यामुळे नाट्यरसिकांची या नाटकाला उत्स्फुर्त अशी दाद दिली.
‘मी’च्या आत्मपरिचयाच्या, आशयांच्या आणि प्रेरणांच्या पल्ल्यांचं सुंदर वर्णन केलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या आत्मविश्वासाच्या, क्षमतेच्या, आणि स्वप्रेमाच्या पल्ल्यांच्या आणि व्यक्तिमत्वाच्या प्रमोटिंगाची प्रेरणा मिळेल. या माध्यमातून, आपण आपल्याला स्वत:च्या प्रेरणांच्या, यशांच्या, आणि स्व योग्यतेच्या पल्ल्यांच्या स्वयंप्रस्तावनेत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळते. मी कोण आहे, हे परिभाषित करणारे अनुभव, आकांक्षांसोबत जीवन जगत असताना आपल्याला कोणीतरी खेळवतोय. ‘तो’एक कोणीतरी आहे. जीवन हा आत्मशोधाचा प्रवास आहे. त्यात स्वत:ला ओळखले की माणूस स्थिरावतो, असे या ‘साखरेचे पाच दाणे’ या नाटकाचे कथासार.
नाटक हे लेखकाचे असते. परंतू, या नाटकाला कल्पक दिग्दर्शनाची जोड मिळाली ही ते नाटक लेखकाचे न राहाता चक्क दिग्दर्शकाचे होऊन जाते. असाच काहीसा प्रकार ‘साखरेचे पाच दाणे’ या नाटकाचे दिग्दर्शक कल्याण वाघमारे यांच्या बाबतीत झाला. नाटकाला कल्पकतेने उभं करण्यात वाघमारे यांनी कसलीच कसर सोडली नाही. रिकाम्या फोटो फ्र्रे मचा केलेला वापर अफातून होता. एकंदर नाटकात वाघमारे यांच्या दिग्दर्शनाने छाप सोडली होती. अरुण बारसकर यांची राजकुमारची मध्यवर्ती भूमिका त्यांनी खुप ताकदीने उभी केली. संवाद, रंगमंचीय हालचाली, हावभाव या सर्वच गोष्टी उत्तम होत्या. सुधनवा पत्की यांचा पुंडलिक त्यांनी ब-यापैकी सादर केला. अजय बेलूरकर यांनी केलेली हरीची भूमिका नाटकाला एक उंची प्राप्त करुन देणारी ठरली. यशवंत कुलकर्णी याचा कोठावळे, अॅड. हंसराज साळूुंके यांनी साकरलेला हवालदार, सुरेंद्र अपसिंगेकर (रघू), सुमती बिडवे (आई), आश्लेषा वाकडे (कोमल) यांनी आपापल्या भुमिकांना न्याय दिला. संजय अयाचित यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे नेपथ्य नागनाथ पांचाळ, विवेक मगर यांचे होते. या दोघांनी नाटकाच्या गरजेनूसार अतिश्य सुरेख नेपथ्य केले होत. दयानंद सरपाळे यांचे पार्श्वसंगीत उत्तम होते. गणपत कुलकर्णी यांची प्रकाश योजना चांगली होती. अॅड. अनुराधा झांपले यांची रंगभूषा, वेशभूषा ब-यापैकी होती.