27.9 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeसापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, १५ जखमी

सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, १५ जखमी

 

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता सर्वात अधिक असून यामध्ये ७ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस २०० फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात ७ जण जागीच ठार तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे ५:३० वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण की, बस घाटात कोसळल्याने दोन तुकडे झाले आहेत. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघात झालेल्या बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR