16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसामान्य माणसांना न्याय देणारे सरकार असायला हवे

सामान्य माणसांना न्याय देणारे सरकार असायला हवे

लातूर : प्रतिनिधी
गोसावी समाज होतकरु कष्टकरी आहे. या समाजाचे कौतुक आहे. गोसावी समाज अभ्यासू चिकिस्तक आहे. सामान्य माणसाला न्याय, सन्मान बहुमान देणारे सरकार असायला पाहिजे. आगामी सरकारकडून गोसावी समाजाच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करु. भटक्या विमुक्त्तांसाठी केंद्राच्या योजना लातूर जिल्ह्यात अधिक खेचून आणल्या जातील. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आल्या पाहिजेत. गोसावी समाजातील महिलाही विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतात त्यांचे कौतुक आहे, असे प्रतिपादन माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव यांनी केले.
येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात रविवारी गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूर आयोजित महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, या महाअधिवेशनाचे अध्यक्ष सुखदेव गिरी, कीर्तनकार अविनाश भारती, गुरुवर्य हभप महादेव महाराज चाकरवाडीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेश बन, गोसावी समाज युवा प्रतिष्ठानचे धर्मवीर भारती, अनिल पुरी, डॉ. विश्रांत भारती, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, मेघाताई भारती, दिलीप पुरी, योगेंद्र गोसावी, गंगाधर पुरी, संदीप गिरी, संतोष गिरी यांची उपस्थिती होती.  पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, राजकारणात चांगली माणसं आली पाहिजेत हे खरं आहे. राजकारण,  समाजकारण हे निर्मळ असावं. माणसं अलीकडे राजकारण म्हणलं की, नको म्हणतात. एक काळ असा होता राजकारणाला प्रतिष्ठा होती.स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींनी उभा केला. ज्या चळवळीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तिचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होय, असे त्यांनी सांगितले
खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, गोसावी समाज राज्यात कमी प्रमाणात आहे. हा समाज विविध क्षेत्रात काम करत आहे. या समाजामध्येही गुणवंत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत हे पाहून समाधान वाटते. गोसावी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करु. समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय देऊ, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार देशमुख यांच्या हस्ते गोसावी समाज महिला प्रतिष्ठान बचत गटाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक गोसावी समाज युवा प्रतिष्ठानचे धर्मवीर भारती यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल पुरी यांनी केले. या अधिवेशनाला गोसावी समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR