सावरगाव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाचखोरी प्रकरणी एलसीबी अँटी करप्शन ब्युरो पथकाने मोठी कारवाई केली आहे, या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. नितीन कालिदास गुंड (वय 32) या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ,त्यांच्यावर तक्रारदाराकडून लाज स्वीकारण्याचा आरोप आहे.
तक्रारदार सत्तावीस वर्षे पुरुष मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात कंत्राटी पदावर कार्यरत आहेत, त्यांना दोन दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी डॉ. गुंड यांनी तीन हजार रुपये लाच मागितली होती, लाच मागणीच्या पडताळणीसाठी बुधवार २४ जुलै रोजी डॉ. गुंड यांनी पंचाच्या उपस्थितीत ही रक्कम स्वीकारली त्यामुळे त्यांना रंगीहात पकडण्यात आले, यातील तक्रारदार हे कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नोकरीस आहेत .
त्यांचे पगार वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचा अधिकार यातील आरोग्य अधिकारी नितीन गुंड यांना आहेत ,यातील तक्रारदार यांची दोन दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयाची मागणी करून सदरील लाच पंचायत समक्ष स्वीकारल्याने त्यांना लाचेसह ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथकाने यशस्वीपणे सापळा रचला आणि आरोपीला अटक केली, पोलीस निरीक्षक विकास राठोड पोलीस अंमलदार इप्तेगार शेख ,मधुकर जाधव ,विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांनी हा सापळा रचला होता ,डॉक्टर गुंड यांच्या विरोधात तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…