26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रसाहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे सेवा आजपासून

साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे सेवा आजपासून

 पुणे : प्रतिनिधी
  दिल्ली येथे होणा-या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनात सहभागी होणा-या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे १९ रोजी (आज)  पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितली.
दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ताल कटोरा स्टेडियम येथे संमेलन होत आहे. संमेलनात सहभागी होणा-या साहित्य रसिकांकरिता सुरू करण्यात येणा-या  रेल्वेच्या डब्यांना किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन या संकल्पनेतून मराठी साहित्ययात्री संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वांत मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे.
 विशेष रेल्वेला १६ डबे असणार असून मराठी भाषामंत्री उदय सामंत रेल्वेद्वारे प्रवास करणार आहेत. साहित्यिक, कलावंतांशी ते संवाद साधणार आहेत. लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची उपस्थिती असणार आहे. प्रवासादरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे. या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR