27.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसिंधू नदीत सापडला सोन्याचा खजिना; पाकिस्तानात झुंबड

सिंधू नदीत सापडला सोन्याचा खजिना; पाकिस्तानात झुंबड

अटक : वृत्तसंस्था
दहशतवाद आणि अंतर्गत संघर्षाने पोखरल्या गेलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था मागच्या काही वर्षात डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी जगभरात हात पसरत फिरत असलेल्या पाकिस्तानच्या हाती खजिना लागला असून, येथील सिंधू नदीमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. नदीत सोनं सापडत असल्याचं समजल्यापासून येथील सोनं गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे.

पाकिस्तानमधील सिंधू नदीमध्ये सुमारे ८०० अब्ज पाकिस्तानी रुपये एवढ्या किमतीचे सोने सापडले आहे. या सोन्याचं वजन सुमारे ६५३ टन एवढं आहे. हे सोनं मिळवण्यासाठी लोक नदी पात्राकडे धाव घेत आहेत. सोनं मिळवण्यासाठी लोक दिवसभर नदीच्या पात्रात भांडीकुंडी घेऊन सोनं गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर स्लुइस मॅटचा वापर करून सोनं बाहेर काढलं आहे. या परिसरात आधी छोट्या प्रमाणावर खाणकाम सुरु होते. परंतू आता येथे मोठ्या संख्येने लोक खोदकाम करण्यासाठी जमा झाले असून लोक बादली भरुन येथील वाळू आपल्या घरी नेत आहेत.

पाकिस्तानमधील पंजाबचे माजी खाण आणि खनिजमंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानचे भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या एका अहवालाच्या आधारावर अटकजवळ ८०० अब्ज रुपयांचं सोन्याचे साठे सापडल्याची माहिती दिली होती. पूर्ण नऊ ब्लॉक असलेल्या या परिसरातील सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये १५५ अब्जांपर्यंतचं सोनं असू शकतं.

मात्र सिंधू नदीमध्ये सोन्याच्या शोधासाठी सुरू असलेल्या खोदकामाबाबत पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते नदीच्या तळाला होणा-या प्रमाणाबाहेरील खोदकामामुळे पाण्यामधील जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच सोनं काढण्यासाठी पा-याचा वापर होत असल्याने नदीची इकोसिस्टिम बिघडू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR