गांधीनगर : वृत्तसंस्था
भारतातील आशियाई सिंहांची संख्या आता तब्बल ८९१ वर पोहोचली असून, ही संख्या २०२० मध्ये ६७४ होती. म्हणजेच पाच वर्षांत ३२.२ टक्के वाढ झाल्याचे १६ व्या सिंह जनगणनेतून स्पष्ट झाले आहे. ही वाढ केवळ संख्या वाढवण्यापुरती मर्यादित नसून सिंहांचे निवासक्षेत्रही लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. केंद्रिय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘एक अभूतपूर्व यश’ अशा शब्दांत सिंहांच्या संख्यावाढीचे कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताला आशियाई सिंहांचे घर मानण्याचा गर्व आहे. २०१५ मध्ये ५२३ सिंह होते, ते आता ८९१ झाले आहेत. हा एक ऐतिहासिक प्रवास आहे.
कधीकाळी तुर्कस्तानपासून भारतापर्यंत सिंहांचे साम्राज्य होते. पण आता ते फक्त गुजरातच्या सौराष्ट्र भागात मर्यादित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, ही वाढ सिंह संवर्धनाच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाची आहे. प्रत्येक वर्षी १० ऑगस्ट रोजी विश्व सिंह दिन साजरा केला जातो. यावर्षीच्या दिवशी भारताने केवळ आकड्यांच्या माध्यमातून नव्हे, तर प्रत्यक्ष संवर्धनाच्या पातळीवर सिंहांना न्याय दिल्याचे सिद्ध केले आहे.
सिंहांच्या वाढत्या संख्येमुळे नवे प्रश्नही उभे राहतात उदा. मानव-सिंह संघर्ष, नवीन अधिवासांचे व्यवस्थापन, आणि जैवविविधतेचे संतुलन राखणे. पुढील टप्प्यात या सर्व बाबींवर लक्ष देणे गरजेचे ठरेल. कधीकाळी तुर्कस्तानपासून भारतापर्यंत सिंहांचे साम्राज्य होते. पण आता ते फक्त गुजरातच्या सौराष्ट्र भागात मर्यादित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, ही वाढ सिंह संवर्धनाच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाची आहे.