30.5 C
Latur
Thursday, March 20, 2025
Homeमनोरंजन‘सिकंदर’च्या रिलीज डेटमध्ये बदल

‘सिकंदर’च्या रिलीज डेटमध्ये बदल

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून चाहते सलमानच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आल्याचे सांगितले आहे.
हा चित्रपट आधी २८ मार्चला (शुक्रवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता ‘सिकंदर’च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. सलमान खाननेही इन्स्टाग्रामवर त्याचा तलवार धरलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ३० मार्च रोजी वर्ल्डवाईड थिएटरमध्ये भेटूया. ३० मार्चला महाराष्ट्रीयन सण गुढीपाडवा देखील आहे. तर ईद सोमवार, ३१ मार्चला आहे.

अनेकदा नवीन सिनेमा शुक्रवारी रिलीज होतात. पण सलमानचा ‘सिकंदर’ चित्रपट ईदनिमित्ताने ३० मार्चला संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सर्वाधिक चित्रपट पाहिले जातात. मात्र या चित्रपटाला लॉन्ग वीकेंडची कमाई करता येणार नाही. त्यामुळे ‘सिकंदर’ रविवारी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की पहिल्याच दिवशी कमाईत घट होणार? हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, परदेशात ‘सिकंदर’ चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

३० मार्चसाठी परदेशात ऍडव्हान्स बुकिंग होत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहेत. तर ‘बाहुबली’ चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR