29.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeलातूरसिटी प्रेस क्लब चाकूरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार जाहीर. मंगेश डोंग्रजकर, शशिकांत पाटील, घोणे...

सिटी प्रेस क्लब चाकूरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार जाहीर. मंगेश डोंग्रजकर, शशिकांत पाटील, घोणे मानकरी

चाकूर : प्रतिनिधी
येथील सिटी प्रेस क्लब चाकूरच्यह्यावतीने पत्रकारिता क्षेत्रासाठी देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कार टाईम्स नाऊ मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील व दैनिकांचे समुह संपादक नरसिंह घोणे यांना तर तालुकास्तरीय पुरस्कार पत्रकार संजीव पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात केले जाणार असल्याची माहिती सिटी प्रेस क्लब चाकूरचे अध्यक्ष प्रा.अ. ना. शिंदे व सचिव मधुकर कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सिटी प्रेस क्लब चाकूरच्यावतीने या वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या पत्रकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी स्व.नागोराव संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ’मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ दैनिक एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांना दिला जाणार आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी कालवश मालनबाई सोपानराव कांबळे व कालवश सोपान काशीराम कांबळे यांच्या स्मरणार्थ’मायदादा वृत्तरत्न पुरस्कार’ टाईम्स नाऊ मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत घोणसे पाटील आणि स्व.काशीबाई बळीराम सोनटक्के यांच्या स्मरणार्थ जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी सोनटक्के यांच्या वतीने ‘पत्रकार भूषण पुरस्कार’ दैनिकांचे समूह संपादक नरसिंह घोणे यांना देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय पुरस्कारासाठी स्व.पत्रकार प्रा.सी.बी.सय्यद यांच्या स्मरणार्थ ‘चाकूर भूषण पत्रकारिता पुरस्कार’ जेष्ट पत्रकार संजीव पाटील यांना दिला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR