अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेशनगर, उजना या कारखान्याचा सन २०२६-२७ चा १४ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नप्रिदिपन सोहळा विजयादशमीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज धानोरकर (कोंडीबा महाराज संस्थान, धानोरा.) व कारखान्याचे मार्गदर्शक व माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेबजी पाटील (सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया.) कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव, संचालक सुरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
त्यापूर्वी महापुजा ऊस उत्पादक शेतकरी श्री व सौ. शोभा दिनानाथ राचमाळे, रा. वायगांव, व श्री व सौ.शुभांगी धनराज धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, यावर्षी अतिवष्टीने सोयाबिन, कापुस या पिकाचे नुकसान झाले आहे. शासनातर्फे शेतक-यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. मतदारसंघात ९ बॅरेजस पैकी ७ बॅरेजसचे काम पुर्णत्वास आले आहे. त्यामुळे दुष्काळात शेतक-यांना या बॅरेजसचा उपयोग होणार आहे. सरकारने शेतक-यांसाठी विविध अशा उपयोगी योजना आणल्या आहेत. हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याचा शेतकी विभाग व सर्वांनी मिळून प्रयत्न करुन ६.७० लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे नियोजन करावे. यावर्षी जिल्हयात व कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, चांगल्या प्रतीचे बेणे वापरण्यास व बेणे प्रक्रिया करणे बाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आवाहन केले आहे.
याप्रसंगी साहेबराव जाधव (तात्या), उत्तमराव देशमुख, अशोक केंद्रे, हेमंतराव जाधव, माणिकराव डोके, मुख्याधिकारी संतोष लोमटे, अविनाश देशमुख, श्रीकांत मजगे, गंगाराम ताडमे, बाळासाहेब बेडदे, मुकुंद देशमुख, शेषेराव चावरे, नरायण दुर्गे, बळीराम माकणे, नरसिंग सांगवीकर, तानाजी राजे आदीसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर एस.आर.पिसाळ, जनरल मॅनेजर (टेक्नीकल.) बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डस्टिीलरी) एस. बी. शिंदे, चिफ फायनांस ऑफिसर आनंद पाटील, कंपनी सेक्रेटरी एस.टी. सावंत, ऊसविकास अधिकारी वाय.आर.टाळे, ऊसपुरवठा अधिकारी व्ही. के. एदले, चिफ इंजिनिअर मुलानी, डे. चिफ केमीस्ट बी.डी. सोमवंशी, डे. चिफ अकौटंट गणेश माने, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, ई.डी.पी. मॅनेजर प्रशांत जाधव, पर्यावरण अधिकारी दिलीप ताटे, गोडावुन किपर अरविंद कदम, हेड टाईम किपर धनंजय टिळक, सिव्हील इंजिनिअर गुणवंत साळुंके, असि. स्टोअर किपर स्वामी, दुग्ध्द संकलन अधिकारी संदीप पाटील, गार्डन सुपर वायझर हरिभाऊ पांचाळ यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार बांधव व सभासद शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचलन संभाजी चोपणे यांनी केले तर आभार कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव यांनी मानले