जळकोट प्रतिनिधी
जळकोट येथील व्यंकटेश काशिनाथ गंगोत्री हा युवक गत २५ वर्षांपासून आपल्या लाडक्या अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करीत असतो . यावर्षीही १७ डिसेंबर रोजी व्यंकटेशने केक कापून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत आपल्या मित्रांच्या तसेच मान्यवरांच्या समवेत त्याचे लाडके अभिनेते रितेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा केला .
जळकोट येथील व्यंकटेश गंगोत्री यांचे कुनकी रोडवर केश कर्तनालयाचे दुकान आहे. लहानपणापासूनच त्याला रितेश देशमुख यांचे वेड आहे. त्याने आपल्या दुकानात सर्वत्र रितेश देशमुख यांच्या विविध प्रकारच्या फोटो लावले आहेत. एवढेच कमी म्हणून की काय त्याने आपल्या हातावर रितेश देशमुख यांच्या नावाचा टॅटू काढला आहे. जळकोटचा व्यंकटी गत २५ वर्षांपासून न चुकता आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतो. वाढदिवस एकटा साजरा करत नाही तर विविध नेतेमंडळी तसेच मित्रपरिवार यांना बोलावून फटाक्यांची आतिषबाजी करीत हा वाढदिवस साजरा करतो. त्याने यावर्षीही आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी डॉ. अविनाश गट्टेवार, डॉ. सचिन सिद्धेश्वरे, तालुका फील्ड ऑफिसर अतुल देशमुख , पत्रकार ओमकार सोनटक्के, अतिक मोमिन, सतिश गोतावळे (मॅनेजर), जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी भास्कर केंद्रे, व्यंकट ढवळे, भारत जाधव, तानाजी तीलमलदार, हुसेन शेख मनोहर केंद्रे हरिदास गुडसुरे, संजय सातापुरे, गुलाम बागवान, ज्ञानेश्वर गंगोत्री, काशिनाथ गंगोत्री, गोपीनाथ गंगोत्री, बाळासाहेब कांबळे, दत्ता लाडके यांच्यासह व्यंकटेशचे कुटुंबीय उपस्थित होते.

