मुंबई : प्रतिनिधी
धारावीतील सायन ढठॠढ कॉलनीत रात्री झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागली. नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील अनेक सिलेंडरचा स्फोट झाला. शंभर मीटर परिसरातील वाहने जळून खाक झाली. जीवितहानी झाली नाही, पण मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी २८३ सिलेंडर जप्त केले आहेत आणि कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नो पार्किंगमध्येच पार्क करण्यात आला होता. आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे ट्रकमधील इतर सिलेंडर्सचेही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. एकूण १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा भडका उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटरपर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाला. २४ तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात उडालेल्या सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडरवर पाणी मारत कुलिंग करायचे काम सुरू आहे.
८ जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिलिंडरची वाहतूक करणा-या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध पार्किंग करणा-या इतर ७ ते ८ जणांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.