18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडासिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे तीन संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी; पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र

सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे तीन संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी; पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र

बार्शी : येथील के.एल.ई. सोसायटी बेळगांवी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे तीन संघ श्री. मल्लीकार्जुन हायस्कूल, हत्तुरेनगर, सोलापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झाले असून पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सिल्वर ज्युबिली हायस्कूलचा १७ वर्षाखालील मुलांच्या व १७ वर्षाखालील मुलींच्या बेसबॉल संघाने इंडियन मॉडेल स्कूल, अक्कलकोटच्या संघांचा अंतीम फेरीत पराभव करुन जिल्हास्तरीय विजेतेपद संयुक्तपणे पटकावले.

तसेच सिल्वर ज्युबिली शाळेच्या १४ वर्षाखालील मुलींच्या सॉफ्टबॉल संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत सनराईज पब्लिक स्कूल, बीबीदारफळ या संघाचा पराभव करुन जिल्हास्तरीय विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धाही श्री. मल्लिकार्जुन हायस्कूल, सोलापूर येथे नुकत्याच पार पडल्या.

शाळेचे हे तिन्ही संघ पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असल्याने शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांच्यासह क्रीडा शिक्षकांचे व सर्व यशस्वी खेळाडूंचे बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या विजयी संघांना क्रिडा शिक्षक हेमंत गाढवे यांनी मार्गदर्शन केले. संघ व्यवस्थापक म्हणून गणेश ऐनापुरे यांनी जबाबदारी पार पाडली. विजयी संघातील सर्व खेळाडूंचा, मार्गदर्शक शिक्षकांसह मध्य प्रदेशातील ग्वॉल्हेर येथे एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या संहशिक्षिका शुभांगी म्हमाणे, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका दिपाली गोरे यांना नेशन बिल्डर म्हणुन रोटरी क्लब, बार्शी यांनी सन्मानीत केल्याबददल त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उपमुख्याध्यापक अनिरूध्द चाटी, पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR