मुंबई : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी पोलिसांनी नागपूरमध्येही धावत्या ट्रेनमधून एका व्यक्तीला संशयित म्हणून पकडले होते. त्याला नंतर सोडून देण्यात आले. आताही पोलिसांनी ज्या आरोपीला पकडले, त्याचा चेहरा आणि सैफवर हल्ला करून बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत असलेल्या व्यक्तीचा चेहरा मॅच होत नसल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी ठाण्यातून मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद याला अटक केली आहे. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर युजर्समध्ये दोघांचे चेहरे मॅच होत नसल्याची चर्चा सुरू झाली. यावर फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदत घेतली. त्यानुसार या दोघांचे फोटो मॅच होतनसल्याचा दावा करण्यात आला आहे. बिलियंट फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन प्रा. लि.च्या हवाल्याने दोन्ही फोटोंची तपासणी करण्यात आली. यामध्ये शरीफुल आणि इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झालेला व्यक्ती वेगळ््या आहेत. या दोन फोटोत खूप फरक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा संशय बळावला आहे.