34.6 C
Latur
Friday, April 11, 2025
Homeलातूरसुधाकर शृंगारे यांच्या पराभवाची जबाबदार स्वीकारतो

सुधाकर शृंगारे यांच्या पराभवाची जबाबदार स्वीकारतो

निलंगा :  प्रतिनिधी
या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा आबकी बार ४०० पारचा नारा होता मात्र विरोधकांनी भाजपा चारसो पार केल्यानंतर संविधान बदलणार हा भावनिक मुद्दा जनतेच्या मनावर रुचविला. ही विरोधकाची भूमिका जनतेला पटवून देण्यास आम्ही कमी पडलो. याचा फटका आम्हाला बसला. मराठा आरक्षणाबद्दल सरकारबद्दल असलेली नाराजी, याचाही  फटका बसल्याने पराभवाला  सामोरे जावे लागले. लातूर लोकसभेचा प्रमुख या नात्याने भाजपाचे उमेदवार सुधाकर  शृंगारे यांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, अशी भावना माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
यावेळी माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, सांगायोचे अध्यक्ष शेषराव ममाळे उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, विरोधकांनी भाजपा सत्तेत आल्यावर संविधान बदलणार हे जनतेच्या मनावर ंिबंबवून भावनिक मुद्दा केला. मराठा आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका समाजापर्यंत पोहोचू शकलो नाही व शेतक-यांच्या मालाच्या बाबतीत सरकारचे ठरलेले पॅकेजचे धोरण शेतक-यांंना पटवून देऊ शकलो नाही यामुळे या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला शिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उतरू शकलो नाही. जनतेला विश्वासात घेऊन त्यांचे समाधान करू शकलो नाही. गत वेळी मिळालेल्या मताधिक्यावरून आमचा अतिविश्वास नडला. आम्ही जनतेला पटवून देण्यात कमी पडलो. समोरचा उमेदवार भूमिपुत्र असल्याने जनतेने त्यांना स्वीकारले व आमचा पराभव झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR