22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसुनक यांच्या पक्षातील ७८ खासदारांचे राजीनामे

सुनक यांच्या पक्षातील ७८ खासदारांचे राजीनामे

वेळेपूर्वी निवडणूक जाहीर केल्याने नाराजी

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षामध्ये भूकंप झाला आहे. त्यांच्या पक्षाच्या तब्बल ७८ खासदारांनी पराभवाच्या भीतीने राजीनामे दिले आहेत. वेळेपूर्वीच निवडणुका जाहीर केल्याने पक्षामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाच्या ७८ खासदारांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. जनतेतली नाराजी आणि पक्षांतर्गत नाराजींना सुनक यांना सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीमध्ये पक्षाला पराभवाचे तोंड बघावे लागेल, असा अंदाज आल्याने राजीनामा सत्र सुरु असल्याचे म्हटले जात आहे. कॅबिनेट मंत्री अँर्डिया लीडसम आणि मिशेल गोव्ह यांना राजीनामा दिला असून निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले आहे. यासह माजी संरक्षण मंत्री यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या १४ वर्षांपासून हुजूर पक्ष सत्तेमध्ये आहे.

विद्यमान सरकारचा काळ जानेवारी २०२५ पर्यंत होता. परंतु सात महिने अगोदर निवडणुका घेण्यात येत आहेत. त्याचे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला मोठे अपयश मिळाले होते. तसेच देशामध्ये वाढत असलेली महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था यामुळे हुजूर पक्षात नाराजी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR