23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : राज्यसभेचे १० खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR