22.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रीम सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका

सुप्रीम सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका

निर्णय सुप्रीम कोर्टाच्या हाती, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी
जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. या प्रकरणी जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालय अंतिम सुनावणी घेऊन निकाल देईल. त्यानंतर जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील. अर्थात निवडणुकांच्या तारखा ठरवायचा अधिकार हा आमचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील मंत्री आणि नवनिर्वाचित भाजप आमदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून नगपालिका व महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे सध्या या संस्थांचा कारभार प्रशासनाकडून पाहिला जात आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना यासंदर्भात माहिती दिली.

राज्यातील विधानसभांच्या निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिंमडळ विस्तार होऊन पहिले अधिवेशनही पार पडले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावरून फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणी होईल. जर याबाबतचा निर्णय जानेवारीत झाला, तर मला वाटते की मार्च-एप्रिलपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक आयोग घेईल, मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरच मार्च-एप्रिलपर्यंत निवडणुका होऊ शकतात, असे म्हटले.

युतीचा निर्णय स्थानिक
पातळीवर : बावनकुळे
राज्यातील विविध महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांसोबत युती करावी अथवा करू नये, या बाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR