26.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रसुशांतसिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचे सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिया चक्रवर्तीविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्याने तिला क्लीन चिट देण्यात आली आहे. तब्बल चार वर्षे चार महिन्यांनी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे, त्यामध्ये सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचे म्हटले आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. तिच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याने अखेर सीबीआयने या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. प्रकरणाच्या चार वर्षे चार महिन्यांनंतर सीबीआयकडून या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केल्याचे या क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकदा आरोप झाले आहेत. रिया चक्रवर्तीसह अनेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी जो काही तपास केला होता, त्यामध्ये सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, यामध्ये कुठलाही संशय नाही असे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. मात्र यामध्ये जेव्हा गंभीर स्वरूपाचे आरोप होऊ लागले तेव्हा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता, आणि सीबीआयने या प्रकरणाचा आतापर्यंत म्हणजे चार वर्षे चार महिन्यांमध्ये तपास केला. त्यानंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये सर्वांत मोठी संशयित होती ती म्हणजे रिया चक्रवर्ती, तिला क्लीन चिट देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR