निलंगा : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी स्व. सुशिलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पार्थिवावर सोमवारी दि १७ फेब्रुवारी रोजी सिंदखेड येथील दादाबागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी भडाग्नी दिली आहे.
यावेळी खासदार डॉ शिवाजी काळगे, माजी खासदार डॉ सुनील गायकवाड , काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, अशोक गोविंदपूरकर, जिल्हा बँकेचे एमडी एच. जे. जाधव, माजी जि. प. अध्यक्ष प्रतिभाताई पाटील कव्हेकर, अजीत पाटील कव्हेकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ शरद पाटील निलंगेकर, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, डी एन शेळके, सुनील माने, सुरेश बिराजदार, अभय चालुक्य, जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे अविनाश रेशमे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी सभापती सिराज देशमुख, माजी सभापती गोविंद शिंगाडे, शिवसेनेचे किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गोरे यांच्यासह तालुक्यातील व जिल् तील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.