24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeक्रीडासूर्या तळपला, भारत सुपर-८ मध्ये

सूर्या तळपला, भारत सुपर-८ मध्ये

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारतापुढे विजयासाठी १११ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर मैदानात उतरलेले टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. त्यानंतर सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि दुबेची संयमी खेळी याच्या जोरावर भारताने ७ विकेटने विजय मिळवला. या विजयासह भारताने सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले.

सूर्यकुमार यादवने ५० धावा केल्या तर शिवम दुबेने ३१ धावा करत चांगली साथ दिली. तत्पूर्वी ऋषभ पंतने १८ धावा केल्या. त्यामुळे विजय सुकर झाला. आजच्या मॅचमध्ये अर्शदीप सिंग आणि अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची गोलंदाजी लक्षात राहिली. अर्शदीप सिंगने अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या तर सौरभ नेत्रावळकरने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केले. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवने ५० धावा केल्या. सूर्या आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी ६५ चेंडूत ६७ धावांची नाबाद भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या साथीने विजयापर्यंत पोहोचवले. त्यापूर्वी अर्शदीप सिंगने अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. अमेरिकेकडूनही सौरभ नेत्रावलकरने २ आणि अली खानने १ विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR