22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसेमीकंडक्टरसह अन्य क्षेत्रात भारत-सिंगापूर यांच्यात करार

सेमीकंडक्टरसह अन्य क्षेत्रात भारत-सिंगापूर यांच्यात करार

सिंगापूर : वृत्तसंस्था
भारत आणि सिंगापूर यांच्यात गुरुवारी नरेंद्र मोदी आणि लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत अनेक क्षेत्रांमधील करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी, हेल्थ अँड मेडिसीन, एज्युकेशनल कॉरपोरेशन अँड स्किल डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. दरम्यान, भारत-स्ािंगापूर सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारी संदर्भात सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे.

दोन्ही देश सेमीकंडक्टर क्लस्टर डेव्हलपमेंट आणि सेमीकंडक्टर डिझाइनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगवर भर देतील.

गेल्या काही दशकांमध्ये सिंगापूरने जागतिक सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. सिंगापूर आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन्ही इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करत आहे. सिंंगापूरमधील विद्यापीठांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्ािंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदी स्ािंगापूरच्या संसदेत पोहोचले. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशातील मंत्री आणि शिष्टमंडळातील सदस्यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामध्ये सेमीकंडक्टरवरील महत्त्वपूर्ण कराराचाही समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR