25.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeलातूरसेवालयातील ५ जोडपी सत्यशोधकीय पध्दतीने विवाहबध्द

सेवालयातील ५ जोडपी सत्यशोधकीय पध्दतीने विवाहबध्द

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा येथे सेवालय प्रमुख प्रा. बापटले यांच्या पुढाकाराने हिराकाशी सेवालय (वृद्धाश्रम) उभारण्यात आले आहे. तसेच सेवालयातील ५ जोडप्यांचा सत्यशोधकीय पद्घतीने विवाह लावण्यात आला. यावेळी माजी मंत्र आ संजय बनसोडे यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ. शिवाजी काळगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर, राजकुमार धुरगुडे पाटील-पुणे, उदगीर बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी हुडे, सेवालयाचे प्रमुख प्रा. रवी बापटले, माधवराव तेलंग गुरुजी, सरपंच सौ. जगदेवी पटवारी, चेअरमन लालाखाँ पठाण, ग्रामपंचायत सदस्या सौ. चंद्रकला संजय पाटील तर वधु वरांचे पालक म्हणून अ‍ॅड. दिपक बनसुडे, मधुकर पोलावर, घाळप्पा गळगे, सौ. मिरा चंबुले, किशनशेठ खत्री, बबन हैबतपुरे अ‍ॅड. विजयकुमार बिरादार यांची उपस्थिती होती.

यावेळी जन्मजात एचआयव्ही संक्रमीत तरुण-तरुणी बालक म्हणून औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालयात आलेली मुले तारुण्यात पदार्पण करीत आहेत. ही मुले-मुली विवाहयोग्य सक्षम बनलेली आहेत. त्यांचीही स्वप्ने आहेत संसाराची, स्वत:चे घर वसवण्याची त्याच अनुषंगाने सेवालय प्रमुख प्रा. रवि बापटले यांच्या नेतृत्वात सेवालयातील ५ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या. वृद्धाश्रामाच्या बांधकामासाठी प्रत्येकी अडीच लाखांचे अर्थसहाय्य केलेले असून त्यात शिवराज हावगीराव टिंमके, सौ. जगदेवी सोमेश्वर पटवारी (सरपंच धोंडीहिप्परगा), डॉ. लक्ष्मी निळकंठराव धोत्रे व डॉ. अलकनंदा धोत्रे, मारोती मगर (माजी सरपंच हिप्परसोगा), मेघा व किर्ती प्रशांत बडगिरे अंबाजोगाई, सौ. सविता महारुद्ध मंगनाळे, सरस्वती तुकाराम महाडीक व कृष्णा तुकाराम महाडीक रायगड, सौ. दिपा श्रीपाद धुकटे छत्रपती संभाजीनगर, सौ. स्रेहलता मारोतीराव पाटील व सौ. सीमा आशिष पाटील सिंगापूर, राजकुमार भानुदासराव धुरगुडे पाटील पुणे, सौ. आनंदा पी. कारभारी -वापी गुजरात, अ‍ॅड. दिपक सोपानराव बनसुडे लातूर, सौ. मंगला विजयकुमार बिरादार व अ‍ॅड. विजयकुमार बिरादार, दिपक सेवकराव खत्री , मधुकर पंढरीनाथ पोलावार आणि दयानंद विश्वनाथ जेवळे हासेगाव, पुणे. यांचा समावेश आहे.

यावेळी प्रा. शाम डावळे, तोंडचिरचे सरपंच सुदर्शन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सामुहिक विवाह सोहळ्यात पाचही जोडप्यांचे लग्न सत्यशोधकीय पद्धतीने माधव बावगे यांनी लावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शैलजा बरुरे यांनी तर आभार प्रभुदास गायकवाड यांनी मानले. यावेळी सेवालयाचे प्रा.डॉ. मनोज मोटे, उमाकांत बापटले अंतेश्वर चिवटे आदींसह परिसरातील व गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR