लातूर : प्रतिनिधी
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालय) मार्फत सुरु असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दि. १७ एप्रिल रोजी जोरदार निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कारवाईला राजकीय सूडबुद्धी असल्याचे सांगत सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ‘ईडी’ चा दबाव आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी केला. मोदी सरकारच्या हुकूमशाहीला काँग्रेसचा विरोध अस झाला आहे, म्हणूनच सोनिया-राहुल यांच्यासारख्या नेतृत्वावर ‘ईडी’ची दडपशाही चालवली जात आहे. हा राजकीय वापर आहे आणि लोकशाहीवर हल्ला आहे, असेही ते म्हणाले. जनतेला हे जुलूम नक्कीच मान्य होणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
यावेळी अभय साळुंके, अमर खानापुरे, रविशंकर जाधव, सुभाष घोडके, कैलास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, अजित माने, अॅड. देविदास बोरुळे पाटील, आयुब मणियार, भाऊसाहेब भडीकर, बिभीषण सांगवीकर, आसिफ बागवान, यशपाल कांबळे, राहुल डूमणे, निलेश देशमुख, अॅड. बाबा पठाण, शेख कलीम, खाजपाशा शेख, अभिजित इगे, युनूस शेख, फारूक शेख, पवनकुमार गायकवाड, सचिन कोतवाड, सिकंदर पटेल, सुपर्ण जगताप, तबरेज तांबोळी, अॅड. सुनीत खंडागळे, विष्णुदास धायगुडे, बालाजी झिपरे, सलीम तांबोळी, पिराजी साठे, धनराज गायकवाड, रिजवान देशमुख, इब्राहिम शेख, अमोल गायकवाड, अनिल शेळके, सोमनाथ तोटाळे, अशोक पोतदार, गोविंद शिंदे, महेश पवार, करीम तांबोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.