१० ग्रॅमचा दर ८९,४०० रुपयांवर, चांदीही वधारली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असून आज बुधवारी सोने दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर ९०० रुपयांनी वाढून १० ग्रॅमसाठी ८९,४०० रुपयांवर पोहोचला तर चांदीचा दरही ६०० रुपयांनी वधारला. या वाढीसह चांदीचा भाव ९९,६०० रुपये प्रतिकिलोग्रॅम इतका झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात असून याच्या मागणीत वाढ होऊन किमतीतही वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादण्याच्या वक्तव्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असून त्याच्या दरात सातत्याने मोठी वाढ झाली आहे.
यावर्षात आतापर्यंत
१० हजारांची वाढ
सोन्याचा दर बुधवारी ९०० रुपयांनी वाढला. ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ८९,४०० रुपये इतका झाला. हा सोन्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. त्याआधी एक दिवस सोने ८८,५०० रुपये तोळा इतके होते. यावर्षी आतापर्यंत सोन्याचा भाव १०,०१० रुपयांनी वाढला. म्हणजे आतापर्यंत सोने दरात १२.६ टक्क्यांची वाढ झाली. १ जानेवारी रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ७९,३९० रुपये होता. आता फेब्रुवारीत हाच भाव ८९,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे.