जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत जोरदार वाढ झाली.
दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याची किंमत ११०० रुपयांनी वाढून ९२,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली. मागील सत्रात ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ९१,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सोन्याचे दर २३,७३० रुपये होते म्हणजेच त्याची किंमत ३५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी ६८,४२० रुपये प्रति १० ग्रॅम होते.
सलग तिस-या सत्रात ही तेजी कायम ठेवत ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याने ११०० रुपयांची उसळी घेत ९१,७०० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला. मागील सत्रात सोनं ९०,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.
चांदीची चमक वाढली
चांदीचा भाव १,३०० रुपयांनी वधारून १,०३,००० रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. १९ मार्च रोजी चांदीने १,०३,५०० रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला.