24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसोमवारपर्यंत अंत्यविधी करा

सोमवारपर्यंत अंत्यविधी करा

अक्षय शिंदेबाबत मुंबई हायकोर्टाचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी बदलापूरनंतर अंबरनाथ शहरातूनही विरोध झाला. दरम्यान, दफनविधीच्या मुद्यावरून अक्षयच्या पालकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यावर हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षयचा अंत्यविधी करा, असा आदेश दिला आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या सूचना योग्यच असून, त्याचा अंत्यविधी झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले.

अक्षयच्या पालकांनी गुरुवारी अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफनविधीची जागा पाहिली. त्यानंतर परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. मनसेच्या वतीने शहरात दफनविधीला विरोध केला. यानंतर अक्षय शिंदेच्या पालकांचे वकील अमित कटारनवरे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सोमवारपर्यंत अंत्यविधी करण्याचा आदेश दिला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने पोलिसांना यासंबंधी आदेश दिले. सध्या अक्षय शिंदेचे पार्थिव जेजे रुग्णालयातील शवागरात आहेत.

प्रशासन कारवाई
करेल : फडणवीस
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे. कुणीही असला तरी त्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करणे सरकारीच संवैधानिक जबाबदारी आहे. तो समाज विघातक असला तरी ते करावे लागते. न्यायालयाने सांगितल्यानुसार प्रशासन कारवाई करेल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR