20.6 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeसोलापूरसोमवारपासून बाळेच्या खंडोबा यात्रेस होणार प्रारंभ

सोमवारपासून बाळेच्या खंडोबा यात्रेस होणार प्रारंभ

सोलापूर : बाळे येथे श्री खंडोबा देवस्थान यात्रेस सोमवार, १८ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्ठी व तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, बुधवार १३ डिसेंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर चंपाषष्ठीनिमित्त सोमवार, १८ डिसेंबर रोजी काकड आरती अभिषेक व महापूजा पालखी सोहळ्याने यात्रेस प्रारंभ होणार आहेत. सोमवारी तसेच पहिला रविवार २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर, ७ जानेवारी २०२४ असे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता अभिषेक व महापूजा, सायंकाळी ८ वाजता अभिषेक व महापूजा, सायंकाळी ८:३० वाजता घोडा व नंदी ध्वजासह पालखी सोह होणार आहे.

बांगरषष्ठी मंगळवार, जानेवारी २०२४ रोजी सकाळी वाजल्यापासून महाप्रसाद वाट कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होण् आहे. पाटील, तोडकरी, कांबळे, सुरव व गावडे आदी सर्व मानकरी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. चंपाषष्टी सोमवार, तीन रविवार असे एकूण चार दिवस खंडोब देवाची यात्रा भरणार आहे. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडण् जावळ काढणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र राज्यातून येतात. तिसऱ्या रविवारी रात्री ८ वाजता शोभेचे दारुकाम होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR