21.4 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeलातूरसोयाबीनच्या दरात चढ-उतार, दर मात्र स्थिर

सोयाबीनच्या दरात चढ-उतार, दर मात्र स्थिर

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असताना बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे. दिवसाकाठी २५ हजार क्विंटलची आवक होत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे दर ४ हजार ३०० रुपयांवर स्थिरावले आहेत.
सोयाबीनला हमीभाव आणि दरात वाढ याची मध्यंतरी मोठी चर्चा झाली. शेतक-यांची आर्थिक स्थिती आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठे नूकसान झाले. त्यामुळे हमीभाव देण्याचा निर्णय झाला. त्यानूसार हमीभव केंद्रही सुरु करण्यात आले. पण केंद्रावरील नियम-अटी यामुळे आणि दरातील तफावत असल्याने शेतक-यांनी खुल्या बाजारातच सोयाबीन विक्रीला पसंती दिली आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस आवक वाढत असली तरी दर हे स्थिरावलेलेच आहेत. आगामी काळातील सण आणि रबी हंगाम यामुळे शेतक-यांना कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. हमीभाव केंद्रावर ४ हजार ८७२ रुपये प्रति क्विंटल दर आहे. सोयाबीनचा दर्जा, आर्द्रतेचे प्रमाण, कागदपत्रांची पूर्तता आणि बील मिळण्यास लागणारा विलंब यामुळे शेतकरी थेट बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री करीत आहेत. चढ-उतार, दर मात्र स्थिर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR