22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरसोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरूच

सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरूच

लातूर : प्रतिनिधी

लातूरच्या आडत बाजार पेठेत दिवाळी पाडव्याच्या नंतर मोठया प्रमाणात सोयाबीनची आवक होऊन दरही यावर्षी प्रथमच ५ हजार रूपयांच्यावर गेला होता. गेल्या आठ दिवसापासून सोयाबीनचा दर ५ हजार रूपयांच्या खाली आला आहे. तर गेल्या महिनाभराच्या तुलनेत सोयाबनच्या दरात प्रतिक्विंटल ३०० रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये सोयाबीन आता विक्री करावी की ? पुन्हा असे चलबिचलचे वातावरण तयार होत आहे.

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामाध्ये ५ लाख ९२ हजार ३६९ हेक्टरवर पेरा झाला होता. यात सर्वाधिक ५ लाख २ हजार ४७९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. जिल्हयात पावसाच्या खंडामुळे मुग, उडीद, सोयाबीन पिकांच्या शेंगा भरण्यावर परिणाम झाल्यामुळे उत्पादनातही मोठया प्रमाणात घट झाली. शेतकरी लातूरच्या आडत बाजार पेठेत मुग, उडीद, सोयाबीन शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. गेल्या महिण्यात दिपावली पाढव्याच्या दिवशी ५३ हजार ६७ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन प्रथमच सर्वाधिक ५ हजार २६१ रूपये दर मिळाला. तर दुस-याच दिवशी ६४ हजार २६४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ५ हजार ३५१ रूपये दर मिळाला. त्यामुळे शेतक-यांमध्ये दिवाळीच्या सणात आनंदाचे वातावरण होते. डिसेंबर उजाडताच सोयाबीनच्या दरात घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी १५ हजार ४७५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ४ हजार ९७१ रूपये दर मिळाला.

सोयाबीनच्या तेजीला ब्रेक
लातूरच्या आडत बाजारात दि. २५ ऑक्टोबर रोजी २६ हजार ५७६ क्विंटल आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ७७३, तर सर्वात कमी ४ हजार ३५१ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दि. १४ नोव्हेंबर रोजी ५३ हजार ६७ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन प्रथमच सर्वाधिक ५ हजार २६१ रूपये, ५ हजार ५८ रूपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला. दि. १६ नोव्हेंबर रोजी ६४ हजार २६४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ५ हजार ३५१ रूपये, तर ५ हजार १९९ रूपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला. दि. ५ डिसेंबर रोजी १५ हजार ४७५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ९७१ रूपये, तर ४ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला. तर दि. ७ डिसेंबर रोजी १६ हजार ७६९ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ८८१ रूपये, तर ४ हजार ८२० रूपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला. सोयाबीनच्या दरात होत असलेली घसरण पाहता शेतकरी सोयाबीन विकावे की ठेवावे या दोलायमान आवस्थेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR