मुंबई : प्रतिनिधी
हंगामातील हरभरा ज्वारीची काढणी झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र शेतक-यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचे याही वर्षी पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे. सध्या तूर, हरभ-याची आवक वाढली आहे. तूर ४ हजार रुपये, हरभरा ५०० रुपयांनी खाली आले आहेत. शेतक-याचे पिवळे सोने म्हणजे सोयाबीनचे दर एक हजार रुपयांनी खाली आले आहे.
मंठा तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीने यंदा कंबरडे मोडले उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले. इतका निचांकी दर सोयाबीनला मिळत आहे. भरीस भर म्हणजे सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने खुल्या बाजारात हरभरा, सोयाबीन, तूर, ज्वारी या शेतकरी धान्याचे गेल्या दहा ते बारा वर्षांतील निचांकी दर गाठले.
या दहा ते बारा वर्षांत पेरणीचे दर गगनाला भिडलेले असताना पीक काढणीचा हंगाम जवळ आला की सरकार बाहेर देशातील शेती माल आयात करते. त्यामुळे या पिकांचे दर घसरले जातात.