26.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeसोलापूरसोलापुरात भूकंपाचे धक्के

सोलापुरात भूकंपाचे धक्के

सोलापूर : राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे, सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. साधारणपणे आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र, भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. सांगोला मतदारसंघात भूकंपाचे केंद्रस्थान आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असतात. येथील कोयना परिसरात भूकंपाचे केंद्र असते, सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी येथील परिसर काहीसा हादरून जातो. मात्र, या भूकंपामुळे लातूरमधील भूकंपाच्या आठवणी ताज्या होतात. सोलापूर जिल्ह्यातील आजच्या भूकंपानंतरही काहींनी लातूरमधील भूकंपाच्या आठवणी ताज्या केल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR