34.2 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeसोलापूरसोलापुरात ‘वाचू संविधान १२ तास’ अभिनव उपक्रम साजरा

सोलापुरात ‘वाचू संविधान १२ तास’ अभिनव उपक्रम साजरा

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत संविधान वाचनाची स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर व महाकारुणिक एज्युकेशनल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. व्ही. एम. मेडीकल कॉलेजच्या ग्रंथालयात घेण्यात आली. सदर स्पर्धा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

या स्पर्धेसाठी ७४ जणांनी सहभाग नोंदविला. वकील, डॉक्टर, मेडीकल, लॉ, इंजिनिअरींग व एम. बी. ए. कॉलेजचे विद्यार्थी यांच्यासोबतच तिसरी चौथी ईयत्तेत शिकणारी लहान मुले व गृहिणी महीला यांनीही सहभाग नोंदविला.

स्पर्धकांना स्पर्धेसाठी भारतीय संविधानाची उद्देशिका व अनुच्छेद क्र.१ ते अनुच्छेद क्र.२०० हा अभ्यासक्रम देण्यात आला होता. याच अभ्यासक्रमावर आधारीत १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने स्पर्धकांची शेवटच्या अर्ध्या तासात परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा मराठी व इंग्रजीमधे घेण्यात आली.

डॉ. श्रेया सोनवणे, डॉ. शबरीश, डॉ. किरण जमखंडी, डॉ. शाझीया खान, डॉ. कुमार प्रसाद, डॉ. अस्मिता म्हस्के, श्रीमती नंदाताई काटे व राजेश मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु. १०,०००/- रु. ५०००/-, रु.३०००/- चे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच रु.१०००/- ची दहा उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ.संजय अंबेकर,(डॉ. बापूजी साळुंखे लॉ कॉलेज, धाराशीव) प्रा. डॉ. श्रीरंग क्षीरसागर, (प्राचार्य, दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सोलापूर) डॉ. सचिन बंदीछोडे, बालरोग चिकित्साशास्त्र (सिव्हिल हॉस्पिटल,सोलापूर) .बालाजी गुरव .बाबासाहेब क्षीरसागर ,यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ. औदुंबर मस्के, डॉ. शुक्लधन रोडे, डॉ. संचीत खरे, ॲड. रवी गजधाने, प्रवीण सोनवणे, ॲड. अमित कांबळे, अशोक मस्के, आनंद शिंदे, विशाल इरागंटी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR