सोलापूरमार्गे मान्सूनची उत्तरसीमा पुढे सरकली

हवामान खात्याचा अंदाज, राज्याच्या काही भागांत व्यापला मान्सून
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतरही मान्सूनच्या पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. याबाबत सातत्याने हवामान विभागाकडून माहिती देण्यात येत आहे. मात्र, आता राज्यात मान्सूनची आगेकूच पाहायला मिळत आहे. ८ जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल झाला असून हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे लवकरच राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती पाहायला मिळत असून तेलंगणाच्या काही भागांमध्येही मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. रत्नागिरीच्या दापोरीजवळी हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतही मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल वातावरण आहे तर ईशान्य भारतातील उर्वरित राज्यांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

कोकणात पावसाचे आगमन
कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. रत्नागिरीमध्येही पावसाचे ढग जमा झाल्याचे चित्र आज सकाळपासूनच बघायला मिळाले. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26
Video thumbnail
हातात माळ, कपाळावर टिळा; रणवीर सिंगने काशीमध्ये घेतलं महादेवाचं दर्शन!
00:30
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21

Latest news