25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे कैफियत

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे कैफियत

पंढरपूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाचा सामना करावां लागत आहे. लॉकडाऊन नंतर १४ फेब्रुवारी २०२१ ला अतिवृष्टीचा दणका बसला. त्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही. यंदाचे खरीप वाया गेले. रब्बीची अपेक्षा संपली_. दुध दर पडलेले आहेत. एका दुभत्या जनावराला एका दिवसाचा साडेतीनशे रुपये चाऱ्याचा खर्च येतो आणि एकीकडे प्रत्येक वर्षी चुरा पेंड सुग्रास पेंड दर तीनशे चारशे रुपये वाढवले जातात आणि उलट दुधाचे दर महिन्यातून दोन महिन्यातून कमी केले जातात हा खूप मोठा अन्याय आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. शेतकरी संकटात आहे त्यामुळे शंभर टक्के शेतीपंपाचे विज बिल माफ करा १००% सरसकट कर्जमाफी करा दूध उत्पादक शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे त्यामुळे त्वरित गाईच्या दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ८० रुपये दर त्वरित जाहीर करावा व राज्यातील दूध संघ आणि खाजगी दूध डेअरीवरती शासनाने कंट्रोल ठेवून त्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालावा असे निवेदनात नमूद केले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यानी कसा तक धरायचा?

उत्पादन घटत आहे. विज बिल भरण्या इतपत ही शेतातून उत्पादन येत नसल्यामुळे पीक कर्ज कशान भरायचे? अशा अनेक अडचणी बाबत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कैफियत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी मांडली.

आमचे सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देऊ, असे आश्वासन ना फडणवीस यांनी दिले होते. सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली नाही .सध्याची परिस्थिती पाहता थंडीचे दिवस आहेत. रात्री साडेबारा वाजता लाईट येते मग शेतकऱ्यांना विंचू साप चावेल का नाही याची तमा न बाळगता जीव धोक्यात घालून दारे धरावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना किमान दहा तास दिवसा लाईट द्या. अशी मागणी ही त्यांनी या निवेदनातून केली आहे.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश नवले युवक जिल्हा उपाध्यक्ष निहाल मुजावर, बाळासाहेब सपाटे ,कांतीलाल गाढवे, शिवशाल हावळे, मारुती भुसनर परमेश्वर काळे बिरू मोठे सुनील आंब्रे, उत्तम सरडे, तानाजी मुळे हरिदास लोंढे अधिजन उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR