सोलापूर : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या चार लाख ४३ हजार २१ विद्यार्थ्यांचे अपार (अॅटोमेटेड पर्मनंट अॅकॅडेमिक रजिस्ट्री) आयडी कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ५७.१२ असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात अपार आयडी तयार करण्याचे काम ५७.१२ टक्के झाले आहे. शाळांना विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून अपार आयडी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळेत काम पूर्ण केले जाईल. असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगीतले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट आयडीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अपार’ आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे.
जिल्ह्यात त्याचे काम सुरू झाले असून चार लाख ४३ हजार २१ विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड तयार झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण चार हजार ७१८ शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या सात लाख ७५ हजार आहे.