सोलापूर-मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागा मार्फत उन्हाळी सुट्ट्यांची सुरवात आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-नांदेड दरम्यान २४ उन्हाळी विशेष गाड्या चोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याविशेष गाड्यांना सोलापूर विभागातील कुडूवाडी आणि लातूर या दोन स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
एलटीटी मुंबई – हुजूर साहेब नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या २४ फेऱ्या आहेत. रेल्वे क्रमांक ०११०५ साप्ताहिक विशेष गाडी ९ एप्रिल ते २५ जूनपर्यंतएलटीटी मुंबईहून दर बुधवारी रात्री १२.५५ वाजता निघतील आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोचेल. गाडी क्रमांक ०११०६ साप्ताहिक विशेष गाडी ९ एप्रिल ते २५ जून या कालावधती हुजूर साहेब नांदेड येथून दर बुधवारी रात्री ८ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २. ४५ वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुडूवाडी, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा हे थांबे आहेत.
दरम्यान, या गाडीसाठी एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, पााच तृतीय वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार (लॉक्ड कंडिशन), एक जनरेटर व्हॅन आणि एक द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असे २२ कोच असतील.