मुंबई : वृत्तसंस्था
सर्वात मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगन ग्रुपच्या स्कोडा ब्रँडने भारतात मोठी करचोरी केली. यावरून स्कोडावर कारवाई करण्यात येत असून १.४ अब्ज डॉलर (१२० अब्ज रुपये)चा कर चुकविल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आलेली होती; याला स्कोडाने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले.
स्कोडाने भारतात पूर्ण वस्तूवर आयात कर जास्त असल्याने स्कोडाने सुटे पार्ट आयात करून ते भारतात जोडले होते. अशाप्रकारे स्कोडाने वेगवेगळ्या ऑर्डर देऊन एकाच कारचे वेगवेगळे सुटे पार्ट आणले. गेली अनेक वर्षे हा खेळ सुरु होता. या प्रकरणी भारतीय कर प्राधिकरणाने स्कोडाला नोटीस पाठविली.
आधीच मूळ देशात आर्थिक संकटामुळे स्कोडाने मोठमोठ्या फॅक्टरी बंद केल्या आहेत. असे असताना आता एवढा मोठा कर भरावा लागला तर कंपनीवर मोठे संकट ओढवणार आहे. या खटल्यावर कर प्राधिकरणाने स्कोडाला करमाफी करण्याविरोधात भूमिका मांडली आहे. १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे १२० अब्ज रुपयांची कर नोटीस रद्द केली तर विनाशकारी परिणाम होणार आहेत. यामुळे कंपन्यांना सूचना लपविणे आणि तपासात विलंब करण्यास वाव मिळेल, असे प्राधिकरणाने कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांत म्हटले आहे.