16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रस्पीड ब्रेकरमुळे पांडुरंगाचा पुनर्जन्म

स्पीड ब्रेकरमुळे पांडुरंगाचा पुनर्जन्म

मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्स आदळली

कोल्हापूर : प्रतिनिधी
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणा-या पांडुरंग उलपे यांना चक्क एका स्पीड ब्रेकरमुळेच पुनर्जन्म मिळाला आहे.

दरम्यान, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६५ वर्षीय पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईक तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केले. नातेवाईक पांडुरंग तात्यांना अन्त्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाऊ लागले. याचवेळी कसबा बावडा परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स एका स्पीड ब्रेकरवर आदळली आणि याचा झटका लागून पांडुरंग तात्या यांच्या हातांची बोटे हलू लागली. आणि तात्यांना जणू जीवदानच मिळाले. कोल्हापूरमध्ये पांडुरंग उलपे यांची चर्चा होत आहे.

पांडुरंग उलपे हे वारकरी संप्रदायातील आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १६ डिसेंबर रोजी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् ते जमिनीवर कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू झाले, पण डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले नाही. डॉक्टरांनी पांडुरंग उलपे यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांना कळवले. घरी अन्त्यविधीची तयारी सुरू झाली आणि अ‍ॅम्ब्युलन्समधून तात्यांना घरी घेऊन निघाले. पण त्याचवेळी कसबा बावडा येथेच रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली. तेथूनच रुग्णवाहिका रुग्णालयाकडे पुन्हा माघारी फिरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR