19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रस्फोटातील मुख्य आरोपी मेहता यांना अटक

स्फोटातील मुख्य आरोपी मेहता यांना अटक

मृतांचा आकडा ११ वर डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरण

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकपोलिसांनी शहरातील मेहेरधाम परिसरातील पेठ रोड येथून ताब्यात घेतले आहे. सूनेच्या भावाकडे त्या अटक टाळण्यासाठी लपून बसल्या होत्या. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील रिऍक्टर स्फोटात ११ जण मृत झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR